शाळा प्रवेश उत्सव

* पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे* ता करवीर जि कोल्हापूर *वार - सोमवार* *दिनांक - १५ जून २०२३* *नवागतांचा स्वागतोत्सव* आमच्या शाळेत सोमवार दिनांक १५ जून २०२३ रोजी शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी . बी पाटील होते . सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले . यानंतर शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मुख्याध्यापक बी बी पाटील सर ज्येष्ठ शिक्षक बी एम पाटील सर यांच्या हस्ते वही व पेन देऊन स्वागत करण्यात आले . इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली . यावेळी सहाय्यक शिक्षक डी एस मोरे एस ए बिरजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यानी मानले .