विज्ञान दिन उत्साहात संपन्न

विज्ञान दिन उत्साहात संपन्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री जी डी लवटे यांनी सर विश्वेश्वरया यांच्या जीवना बद्दल माहिती देऊन त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक श्री एस पी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील होते. तर आभार क्रीडा शिक्षक डी एस मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.