शालेय विद्यार्थ्यांसाठी एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

 शालेय विद्यार्थ्यांसाठी एड्स  संवेदीकरण कार्यशाळा संपन्न 



11/09/2025

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी संवेदीकरण कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेला समुपदेशक महेश्वरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स रोगाविषयी माहिती देऊन त्याची लागण व दक्षता त्याबाबत माहिती दिली . याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय खुपिरे येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ सतीश पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेची ज्येष्ठ शिक्षक गजानन लवटे यांनी केले तर स्वागत सहाय्यक शिक्षक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बीबी पाटील होते तर आभार डीएस मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट

जागतिक पर्यावरण दिन