नावागतांचे स्वागत


 वार - शनिवार 

 दिनांक - १५ / ६ / २०२४


आमच्या शाळेत आज शाळा नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव    साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . 

यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक पेन व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .

यावेळी बोलताना मुख्याध्यापक डॉ .बी .बी .पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी शाळेत अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम राबविले जातात यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार सहभाग घ्यावा असे आवाहन केले .

सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले. सहाय्यक  शिक्षक बी एम  पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर इतर सहशालेय उपक्रम व खेळ यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले.या प्रसंगी  सर्व  नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी सहाय्यक शिक्षक एस पी पाटील डी एस मोरे  एस ए बिरंजे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होतेविद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात

गुरुपौर्णिमा