करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन
करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमांतर्गत विठाई चंद्राय हॉल येथे शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले.
विठाई चंद्रई हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे उपस्थित होते.
विद्यार्थिनींना महिला विषयक कायदे, आहार व आरोग्य, कौटुंबिक वाद विवाद निराकरण, बचत गट दक्षता, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची दक्षता व करिअर मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या 50 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment