Posts

Showing posts from July, 2025

लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

Image
 लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी  आज लोकमान्य टिळक जयंती शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे कर्मचारी डी एच शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक डी एस मोरे यांनी लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांचा बाणेदारपणाविषयक केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस पी पाटील यांनी केले तर आभार जी डी लवटे यांनी मांनले 

शालेय विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली

Image
 हायस्कूल मधील इयत्ता दहावी तील विद्यार्थी विद्यार्थिनींना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली.  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकर यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी धनुर्वात प्तिबंधक लस देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असा हा उपक्रम शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाखरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी

Image
  शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी  17/07/2025 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे यांचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिमोगलोबिन तपासणी  करण्यात आली. यामध्ये शाळेतील 117 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. राजू ढेंगे व पूनम यादव यांनी उपकेंद्रातीक कर्मचारी  आशा यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी विध्यर्थ्यांना रक्तातील हिमोगलोबिनचे योग्य प्रमाण व आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान

Image
  शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान  दिनांक 14/07/2025  मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापुर यांच्या मार्फत  पै शंकर तोड़कर हायस्कूल वाकरे शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले  या प्रसंगी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक नियुक्त सरपंच सौ अश्विनी पाटील उपस्थित होत्या यावेळी वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक श्री सागर भोसले यानी वाहतूकीचे नियम समजावून सांगितले तसेच वाहन चालवताना कशी काळजी घ्यावी हे सांगितले. त्यानंतर सहाय्यक वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक निकिता नाईक यानी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली.यावेळी ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था अध्यक्ष श्री के एच माने सचिव श्री शिवाजीराव तोड़कर संचालक श्री ए बी बिरजे उपसरपंच श्री अमर करपे ग्राम पंचायत सदस्य श्री विजय पाटिल श्री तुषार मोरे श्री धनाजी पाटील उपस्थित होते तसेच श्री  सुरेश करपे श्री  चंद्रकांत पाटील श्री आनंदा गुरव श्री सुभाष करपे उपस...
Image
  दिनांक १०.०७.२०२५ गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात  आज आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. बी बी पाटील सर  होते.सुरुवातीला इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु.चैत्राली पाटील कु.भक्ती पाटील कु. राजनंदिनी पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. शाळेचे शिक्षक श्री. जी.डी. लव्हटे सर यांनी आपल्या प्रास्ताविक  मध्ये व्यक्तीच्या जीवनातील गुरुचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.मुख्याध्यापक मा. बी.बी.पाटील सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रानुसार त्यांना गुरु  असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो त्यामुळे व्यक्तीचे ध्येय प्राप्त करता येते असे सांगितले. सूत्रसंचालन श्री एस पी पाटील सर यांनी केले तर आभार श्री डी एस मोरे सर यांनी मानले

कृषी दिनानिमित्य वृक्षारोपण संपन्न

Image
 ०१.०७.२०२५ कृषी दिनानिमित्य वृक्षारोपण संपन्न  कृषिदिन निमित्य शाळेच्या क्रिडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे महत्व याप्रसंगी विषद करण्यात आले .

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान .

Image
 दिनांक २७.०६.२०२५  आमदार  जयंत आसगावकर  यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान . पुणे विभागाचे शिक्षक आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर साहेब यांच्या फंडातून आमच्या पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे शाळेस स्मार्ट टीव्ही देण्यात आला .यावेळी आमदार जयंत  आसगावकर साहेब सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे, डी एच शिंदे, प्रा एस पी चौगले, अमेय आसगांवकर आदी .

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
  दिनांक २६.०६.२०२५ राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे     राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली .  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  आर.के.कांबळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनी देवयानी कांबळे अनुष्का चौगले चैत्राली पाटील भक्ती पोवार श्वेता परिट  प्राची पाटील  श्रेया पाटील यांनी  शाहू महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. आर के कांबळे  यांनी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्याचा आढावा घेतला बी.बी.पाटील  यांनी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य व सांस्कृतिक कार्याविषयी माहिती दिली यावेळी सहाय्यक शिक्षक जी.डी. लव्हटे , एस पी पाटील,  डी एस मोरे, एस ए बिरंजे , डी एच शिंदे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . आभार कु. श्रेया पाटील हिने मानले .सूत्रसंचलन कु. प्रणाली पाटील व कु.अनुष्का मोरे यांनी केले...