राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
दिनांक २६.०६.२०२५
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आर.के.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनी देवयानी कांबळे अनुष्का चौगले चैत्राली पाटील भक्ती पोवार श्वेता परिट प्राची पाटील श्रेया पाटील यांनी शाहू महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. आर के कांबळे यांनी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्याचा आढावा घेतला बी.बी.पाटील यांनी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य व सांस्कृतिक कार्याविषयी माहिती दिली यावेळी सहाय्यक शिक्षक जी.डी. लव्हटे , एस पी पाटील, डी एस मोरे, एस ए बिरंजे , डी एच शिंदे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . आभार कु. श्रेया पाटील हिने मानले .सूत्रसंचलन कु. प्रणाली पाटील व कु.अनुष्का मोरे यांनी केले.
Comments
Post a Comment