दिनांक १०.०७.२०२५
गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात
आज आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. बी बी पाटील सर होते.सुरुवातीला इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु.चैत्राली पाटील कु.भक्ती पाटील कु. राजनंदिनी पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. शाळेचे शिक्षक श्री. जी.डी. लव्हटे सर यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये व्यक्तीच्या जीवनातील गुरुचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.मुख्याध्यापक मा. बी.बी.पाटील सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रानुसार त्यांना गुरु असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो त्यामुळे व्यक्तीचे ध्येय प्राप्त करता येते असे सांगितले. सूत्रसंचालन श्री एस पी पाटील सर यांनी केले तर आभार श्री डी एस मोरे सर यांनी मानले
Comments
Post a Comment