पै.शंकर तोडकर हायस्कूल येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना सहायक शिक्षक गजानन लव्हटे यांनी पर्यावरणाच्या जागृती बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमांतर्गत विठाई चंद्राय हॉल येथे शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. विठाई चंद्रई हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे उपस्थित होते. विद्यार्थिनींना महिला विषयक कायदे, आहार व आरोग्य, कौटुंबिक वाद विवाद निराकरण, बचत गट दक्षता, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची दक्षता व करिअर मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या 50 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट ०२ ऑगस्ट २०२५ पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट दिली तेथील व्यवस्थापक पांडुरंग बिरंजे व सुरेश तोडकर यांनी बँकिंग व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना दिली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष हिंदुराव पाटील व डी.एस मोरे व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
दिनांक ५ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिन पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे जातीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श शिक्षक आर.के.कांबळे यांनी विकासाच्या नावाखाली पर्वर्नाकड दुर्लक्ष केल्याने जागतिक स्तरावर अनेक समस्या निर्माण झाल्याचे सांगून पर्यावरणआचा समतोल राखण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहण्याची गरजा असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment