नवागतांचे स्वागत -शाळा प्रवेशोत्सव २०२५ आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके व शालापयोगी साहित्याचे वाटप

 दिनांक. १६/०६/२०२५


💢 पी एस तोडकर हायस्कूल वाकरे शाळा प्रवेशोत्सव आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचे वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत. 💢   

वाकरे तालुका करवीर  येथील पी एस तोडकर हायस्कूल मध्ये शाळा प्रवेश उत्सवा अंतर्गत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे  व शालू उपयोगी साहित्याचे वितरण पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष के एच माने होते.  याप्रसंगी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणामध्ये स्पर्धा असून विद्यार्थ्यांनी मोबाईल सारख्या प्रलोभना पासून दूर राहून आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान केली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जीडी लवटे यांनी केले तर आभार एस. पी.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर, सदस्य अशोक बिरंजे,महादेव मोहिते, प्रा. एस पी चौगले,  प्रा. बी एल पाटील, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात