इयता १० वी पालक सभा संपन्न

पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर वार - मंगळवार दिनांक - २५ जुलै २०२२ इयता १० वी पालक सभा संपन्न पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे तालुका करवीर येथे इयत्ता दहावीच्या वर्गाची पालक सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी वाकरी ग्रामपंचायतचे सदस्य बुधाप्पा कांबळे होते. सभेचे प्रास्ताविक इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक आर के कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांची कोरोना नंतरची शिकण्याची मनस्थिती व आव्हाने या विषयी शाळेचे सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी माहिती दिली. डी एस मोरे यांनी मुलांचे आरोग्य व्यायाम अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक बी बी पाटील यांनी कोरोना नंतरच्या काला वधीमध्ये शिक्षण क्षेत्रात समोर असलेली आव्हाने याचा मागवा घेऊन शाळेच्या विविध उपक्रमांना पालकांनी सहकार्य करावे तसेच विद्यार्थ्यांना घरात अभ्यासासाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये प...