पालक सभा इयता ८ वी ९ वी पालक सभा संपन्न
पै . शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - मंगळवार दिनांक - २६ जुलै २०२२
पालक सभा इयता ८ वी व ९ वी संपन्न
सदर पालक सभेमध्ये प्रास्ताविकामध्ये सहायक शिक्षक जी डी लव्हटे यांनी कोरोना कालखंडानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनेक आव्हाने निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक लॉस भरून काढण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
ज्येष्ठ शिक्षक बी एम पाटील यांनी मुलांचे आरोग्य आहार शाळेतील उपस्थिती अभ्यास याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक बेबी पाटील यांनी कोरोना कालखंडानंतर मुलांचे झालेले शैक्षणिक मानसिक भावनिक शारीरिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभाग सर्व स्तरावरती प्रयत्न करत असून पाल्याच्या विकासामध्ये पालकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घरामध्ये अभ्यासासाठी योग्य प्रकारचे शैक्षणिक पर्यावरण पर्यावरण उपलब्ध करून द्यावे असे आवाहन केले. मुलांच्या प्रगतीत शाळेबरोबरच पालक आणि समाजाने भागीदारी करण्याची गरज असून एकमेकांच्या सहकार्याने मुलांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाल्यांना केवळ शैक्षणिक साहित्य दिले म्हणजे पालकांची जबाबदारी पूर्ण झाली असं होत नाही तर त्याच्या प्रगती विषयी पालकांनी शाळेला वारंवार भेटी देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आपला अध्यक्ष भाषणामध्ये मारुती बिरंजे यांनी शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांना पालकांनी साथ द्यावी असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी मानले.
सभेसाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment