नागपंचमी - सर्प समज गैरसमज या विषयी व्याख्यान

 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

 वार - मंगळवार  दिनांक - २ ऑगष्ट २०२२



 नागपंचमी - सर्प समज गैरसमज या विषयी  व्याख्यान 

आमच्या शाळेत  नागपंचमीनिमित्त सर्प समज गैरसमज या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यानातून माहिती देण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते .                            

          सुरुवातीस सांस्कृतिक विभाग प्रमुख  शिक्षक  जी.डी लव्हटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .

         सहाय्यक शिक्षक आर के कांबळे यांनी पर्यावरण संतुलनात सापांचे महत्त्व या विषयावर माहिती देताना विषारी व बिनविषारी साप तसेच  सापाविषयी समाजात असणारे  समज  गैरसमज याबाबत माहिती दिली .साप हा मानवाचा शत्रू नसून तो एक प्रकारे मित्र असल्याचे सांगितले .  सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार करून तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत .अंधश्रद्धा बाळगून . इतर अघोरी उपचार करू नयेत असे त्यांनी यावेळी सांगितले .

           आभार सहाय्यक शिक्षक बी एम  पाटील यांनी मानले .

        यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात