Posts

Showing posts from September, 2022

क्षेत्रभेट - विट उदयोग

Image
  पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर  क्षेत्रभेट - विट उदयोग   दिनांक २८/ ०९/२०२२ आज गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी गावातील मुक्ताई वीट उद्योग समूह या वीट उद्योगास क्षेत्रभेट अंतर्गत भेट दिली.सुरुवातीस या उद्योग समूहाचे मालक विजय पोवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांचे स्वागत करून वीट उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, वीट निर्मितीची प्रक्रिया, वीट निर्माण करण्याची, त्यानंतर तयार झालेल्या मालाचे वितरण यासंबंधी माहिती दिली. अर्थकरणाबरोबरच वीट उद्योगाचे व्यवस्थापन यासंबंधी माहिती दिली तसेच मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. उद्योगाच्या माध्यमातून जवळपास पंधरा कुटुंबांना तसेच पाच ट्रॅक्टर चालकांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक आर के कांबळे सर व डी एस मोरे सर उपस्थित होते.

क्षेत्रभेट - रोपवाटिका अभ्यस भेट

Image
पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर  क्षेत्रभेट मनस्वी रोपवाटिका  वाकरे  दिनांक २९/ ०९/२०२२ आज गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट अंतर्गत गावामध्ये असणाऱ्या मनस्वी रोपवाटिकेला अभ्यास भेट दिली. सर्वप्रथम रोपवाटिकेचे मालक प्रदीप पाटील यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे स्वागत केले त्याचबरोबर रोपवाटिकेचे काम कसे चालते प्रत्यक्षपणे मुलांना समजावून सांगितले. रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेली भाजीपाल्याची रोपे तसेच उसाचे रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शाळेच्या परिसरामध्ये ऊस हे प्रमुख पीक असल्याने विद्यार्थ्यांनी यासंबंधी बेणे तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली व त्यावरती रोपवाटिका मालक यांना विविध प्रश्न विचारले.  रोपवाटिकेतून अर्थार्जनाबरोबरच शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळवून देण्याचा मानस असल्याचा  मनोदय त्याने व्यक्त केला.आधुनिक मशनरी वरती उसाच्या पेरा पासून उसाचा डोळा वेगळा करण्याची पद्धत मुलांनी पाहिली. प्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक आर के कांबळे सर डी एस मोरे सर बी एम पाटील सर उपस्...

क्षेत्रभेट नदीकिनारा

Image
पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर  क्षेत्रभेट नदीकिनारा दिनांक २८/ ०९/२०२२   बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत गावच्या ददक्षिणेस असलेल्या भोगावती / पंचगंगा नदीस भेट देऊन अभ्यास केला. त्याप्रसंगी भूगोल विषय शिक्षक आर के कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना नदीचा उगम, नदीला मिळणाऱ्या उपनद्या, नदी वरती बांधण्यात आलेले धरणे व तलाव, प्रदूषण कशाप्रकारे होतं याची माहिती दिली.त्याचबरोबर पाण्यापासून आर्थिक उत्पन्न, पिण्याचे पाण्याची शुद्धीकरण तसेच पाणी प्रदूषित करणारे घटक यासंबंधी माहिती दिली.

समुपदेशन व संमोहन कार्यशाळा

Image
  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  ता करवीर जि कोल्हापूर समुपदेशन व संमोहन कार्यशाळा   वार -  शुक्रवार  दिनांक - २३ सप्टेंबर २०२२ पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे  समुपदेशन व संमोहन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली . निसर्ग समुपदेशन केंद्र निगवे दुमाला चे  संमोहन तज्ञ दीपक पाटील   यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले तसेच संमोहनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाला सूचना दिल्या . या उपक्रमास शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .      स्वागत व प्रास्ताविक बी एम पाटील यांनी केले . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक आर के कांबळे जी डी लव्हटे एस पी पाटील शिक्षकेतर कर्मचारी एस ए बिरंजे  डी एच शिंदे यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार डीएस मोरे यांनी मानले .

दक्षिणायन प्रारंभ दिन

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर दक्षिणायन प्रारंभ दिन  वार -  शुक्रवार  दिनांक - २३ सप्टेंबर २०२२  या भौगोलिक घटनांची माहिती विशद करताना पृथ्वीची परिवलन गती व त्यामुळे होणारे ऋतू याची माहिती दिली. त्याचबरोबर दक्षिणायन उत्तरआयान ह्या नैसर्गिक घटना असून त्यामुळेच पृथ्वीवरती अनेक घडामोडी घडत असतात. प्रामुख्याने पृथ्वीच्या तापमानामध्ये बदल होऊन अनेक ऋतूंची निर्मिती होत असते असे सांगितले.पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   दक्षिणायन आरंभ याबाबत भूगोल विषयाचे शिक्षक आर के कांबळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली . त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती संपन्न

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर   कर्मवीर भाऊराव पाटील जयंती संपन्न दिनांक २२ सप्टेंबर २०२२  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  ता करवीर जि कोल्हापूर  वार -  गुरुवार  दिनांक - २२ सप्टेंबर २०२२      कर्मवीर भाऊराव पाटील जयंती  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील  होते .       अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. बी .बी पाटील यांनी  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली .     सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे  यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी  रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या साठी केलेले शैक्षणिक कार्य सांगितले . तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक सुधा...

इंग्लिश डे उत्साहात संपन्न

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर इंग्लिश डे उत्साहात संपन्न  दिनांक - २० सप्टेंबर २०२२    इंग्रजी दिन  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   इंग्रजी दिन उत्साहात साजरा झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील  होते .प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षक बी एम पाटील उपस्थित होते .      अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. बी .बी पाटील यांनी जागतिक स्तरावर आज इंग्रजी भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे .शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये संभाषण करण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची गरज असल्याचे सांगितले . फक्त इंग्रजी दिनाच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी मधून भाषा न करता दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी आपापसात इंग्रजी मधून संभाषण करावे असे आवाहन केले .        प्रमुख पाहुणे बी एम पाटील यांनी इंग्रजी भाषेचे महत्व सांगून भविष्यातील उच्च शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत होण्याची गरज असल्याचे सांगितले .विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फ...

योगा व सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न.

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर  योगा व सूर्यनमस्कार प्रशिक्षण संपन्न. दिनांक १७ सप्टेंबर २०२२ कोरोना काळात विद्यार्थ्यांची मागे पडलेली  व्यायामाची सवय पुन्हा लागावी व आरोग्यासाठी उपयुक्त असणारी योगासने त्याचबरोबर प्राणायाम आणि सूर्यनमस्कार याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.  क्रीडा शिक्षक डी एस. मोरे व बी.एम.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम योगासने व सूर्यनमस्कार या विषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांच्याकडून त्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. शालेय जीवनातील मुलांच्या आरोग्याला  महत्त्व असल्याने सदरचा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील आयको वार क्नलिक करा  

इयत्ता आठवी पालक सभा संपन्न

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर  इयत्ता ८वी पालक सभा वार - सोमवार  दिनांक - १९ सप्टेंबर २०२२ पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   इयत्ता आठवीच्या वर्गाची पालक सभा संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी पालक  सदाशिव मोरे होते .    यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांनी इयत्ता आठवीच्या वर्गासाठी असलेल्या एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबत पालकांना माहिती दिली .विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा तसेच शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घरामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून शाळेत सहकार्य करावेसे आव्हान केले . माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतःच्या देखरेखीखाली  थोडा वेळ  स्मार्टफोन देण्याबाबत पालकांना सांगितले .       सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती पालका...

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात

Image
 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर   झिम् फुगडी स्पर्धा उत्साहात   वार - शुक्रवार  दिनांक - १६ सप्टेंबर २०२२   झिम्मा फुगडी स्पर्धा            पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे  आज झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेत तीन सांघिक संघानी सहभाग घेतला .त्याचबरोबर फुगडी ,काटवटकणा , लाट्या बाई लाट्या ,कंगवा फणी फुगडी, सुप नाचवने ,घागर घुमवणे ,उखाणे या सात प्रकारच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेत शाळेतील  ७६ मुलींनी सहभाग घेऊन आपली कला  सादर केली .   सांघिक  झिम्मा स्पर्धेत इयत्ता दहावीच्या हिरकणी ग्रुपने प्रथम क्रमांक इयत्ता नववीच्या शिवकन्या ग्रुपने द्वितीय क्रमांक तर इयत्ता आठवीच्या जिजाऊ ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला .  गटवार निकाल पुढीलप्रमाणे    फुगडी  कु .पोवार असावरी तानाजी व कु .पोवार सृष्टी परशुराम ( प्रथम) कु .कांबळे रचना शहाजी व  कु .कांबळे वेणू महादेव (द्वितीय) कु.पोवार  अनुष्का तानाजी व कु.चौगुले अनुष्का व...

अभियंता दिन

Image
 पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर   अभियंता दिन   वार - गुरुवार  दिनांक - १५ सप्टेंबर २०२२ अभियंता दिनानिमित्य  माहिती देताना जी.डी. लव्हटे सर पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील होते .       स्वागत व प्रास्ताविक  अध्यापक एस पी पाटील यांनी केले .सहाय्यक शिक्षक यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती देऊन अभियंता दिनाचे महत्त्व सांगितले .तसेच अभियंता क्षेत्रातील विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली .      यावेळी सहाय्यक शिक्षक बी एम पाटील    आर के कांबळे   एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार डी एस मोरे यांनी मानले  .

हिंदी दिन कार्यक्रम

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर     हिंदी दिन कार्यक्रम दिनांक १४ सप्टेंबर २०२२ पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर  वार - मंगळवार  दिनांक - १४ सप्टेंबर २०२२      हिंदी  दिन  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा करण्यात आला .     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील होते .   यावेळी हिंदी भाषेमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या .यामध्ये  चार मुले व दहा मुली अशा एकूण १४  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यामध्ये कु. श्वेता संभाजी पोवार हिने प्रथम क्रमांक कु. हर्षदा संदीप पोवार व कु . गौरी राजाराम पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक कु. ज्ञानेश्वरी संदीप पाटील हिने पटकाविला        स्वागत व प्रास्ताविक हिंदी विषयाचे अध्यापक आर के कांबळे यांनी केले  .यावेळी सहाय्यक शिक्षक बी एम पाटील    जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थ...

सही पोषण देश रोशन

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर     पोषण महा अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन कार्यक्रम अंतर्गत सकस आहार  मार्गदर्शन , किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन, पोषण रॅली व पोषण शपथ कार्यक्रम संपन्न,  दिनांक १३ सप्टेंबर २०२२  राष्ट्रीय पोषण महा उपक्रमाअंतर्गत सही पोषण देश रोशन उपक्रमामध्ये पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. एकात्मिक बालक विकास कार्यक्रमाच्या परीक्षिका सौ सुतार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार बद्दल माहिती देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात उत्पादन केले. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी किशोरवयीन आरोग्याची काळजी व सकस आहार याबद्दल माहिती देण्यात आली त्याचबरोबर स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सही पोषण देश रोशन या उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली व सकस आहाराविषयी जनजागृती करण्याचे मनोगत व्यक्त केले. याच उपक्रमांतर्गत गावांमधून रॅली काढण्यात आली व ग्रामस्थांच्या मते सकस आहार विषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी सकस पोषण आहारासंबंधी विविध घोषणा देण्यात आल्या.

शिक्षक दिन

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर   शिक्षक दिन पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर  वार - गुरुवार  दिनांक - ८ सप्टेंबर २०२२       शिक्षक दिन    डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती       पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  येथे गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक डॉ .बी .बी पाटील होते .   या दिवशी शाळेचे संपूर्ण  कामकाज विद्यार्थ्यांनी  केले .           छात्रमुख्याध्यापिका म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी श्रुतिका सदाशिव पाटील हिने जबाबदारी पार पाडली -उपमुख्याध्यापिका म्हणून प्राची शिंदे हिने काम पाहिले .लिपिक म्हणूनत तन्वी  पाटील व शिवरंजन लोहार यांनी काम पाहिले .           वर्ग अध्यापनाचे कामकाज गौरी पाटील ,समीक्षा पाटील ,तन्वी पाटील, श्रुतिका सरदार पाटील, श्रुतिका कुंभार, श...

ऍक्टिव्हिटी ऑफ ऑगस्ट मंथ

Image
  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर ऍक्टिव्हिटी ऑफ ऑगस्ट मंथ ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल सृजन  शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व विकास करण्यासाठी  ऍक्टिव्हिटी ऑफ मंथ हा उपक्रम शाळेमध्ये साजरा केला जातो. महिन्याभरामध्ये विद्यार्थी आपल्या कल्पनाशक्ती प्रमाणे चित्रे,मॉडेल्स,प्रतिकृती, शोभेच्या विविध वस्तू त्याचबरोबर विविध विषयावरती लेखन करतात त्याचे सादरीकरण महिन्यातून एकदा केले जाते. ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये लेख चित्रे व विविध शोभेच्या वस्तू त्यांचा समावेश आहे

करवीर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेच्या उपकरणाचा सहभाग

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर   करवीर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेच्या उपकरणाचा सहभाग  दिनांक ०६/०८/२०२२   मुख्यविषय - तंत्रज्ञान आणि खेळणी  उपविषय -पर्यावरणास अनुकल सामग्री  विषय  -  शेती आधारित स्टार्टअप सहभागी विर्द्यार्थी - आदित्य प्रदीप पाटील इयत्ता दहावी  स्थळ रा.बा.पाटील माध्यमिक विद्यालय सडोली खालसा. तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर   पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास उत्स्फूर्त प्रतिसाद  दि,०५. ०८. २०२२  पर्यावरण मंडळ पी.एस.तोडकर हायस्कूल वाकरे आणि ग्रामपंचायत वाकरे यांनी केलेल्या अवाहनास वाकरे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. गणेश भक्तांकडून मूर्ती व निर्माल्याचे दान.  ग्राम पंचायतीने तयार केलेल्या कुंडात गणेश विसर्जन  करताना ग्रामस्थ विसर्जनानंतर ग्राम पंचायतीकडे  मूर्ती दान करताना ग्रामस्थ  निर्माल्य दान करताना ग्रामस्थ 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव अवाहन

Image
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर पर्यावरणपूरक गणेशोत्सव अवाहन   एक पाऊल आधुनिकतेकडे ........ दिनांक - २९.०८.२०२२ पर्यावरण मंडळ  पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे अवाहन......                 नमस्कार मित्रानो. बुद्धीची देवता गणरायाचा आगमन होतय. त्यासोबतच त्याचबरोबर गौरी आणि शंकराचे आगमन होते आहे. आपल्या परंपरा सण उत्सव हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. मित्रांनो सण साजरी करूया पण पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवून. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या आणि विविध स्त्रोतांचे होणारे प्रदूषण रोखणे ही आज काळाची गरज बनली आहे. भावी पिढीला शाश्वत पर्यावरण पूरक विश्व देण्यासाठी खबरदारी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आम्ही आपल्याला पर्यावरण पूरक गणेश उत्सव व गौरी गणपतीचा सण साजरा करावा असे आवाहन करत आहोत. श्रद्धेला आधुनिक पर्यावरण पूरकतेची जोड देऊन परंपरा जपण्याबरोबरच सणांचा आनंदही लुटुया. यासाठी आपण खालील बाबी करू शकतो. 1. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडूच्या मूर...