समुपदेशन व संमोहन कार्यशाळा
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे ता करवीर जि कोल्हापूर
समुपदेशन व संमोहन कार्यशाळा
वार - शुक्रवार दिनांक - २३ सप्टेंबर २०२२
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे समुपदेशन व संमोहन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली . निसर्ग समुपदेशन केंद्र निगवे दुमाला चे संमोहन तज्ञ दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले तसेच संमोहनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाला सूचना दिल्या . या उपक्रमास शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .
स्वागत व प्रास्ताविक बी एम पाटील यांनी केले . यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक आर के कांबळे जी डी लव्हटे एस पी पाटील शिक्षकेतर कर्मचारी एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार डीएस मोरे यांनी मानले .
Comments
Post a Comment