पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर
शिक्षक दिन
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
वार - गुरुवार दिनांक - ८ सप्टेंबर २०२२

शिक्षक दिन
डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी .बी पाटील होते .
या दिवशी शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी केले .
छात्रमुख्याध्यापिका म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थिनी श्रुतिका सदाशिव पाटील हिने जबाबदारी पार पाडली -उपमुख्याध्यापिका म्हणून प्राची शिंदे हिने काम पाहिले .लिपिक म्हणूनत तन्वी पाटील व शिवरंजन लोहार यांनी काम पाहिले .
वर्ग अध्यापनाचे कामकाज गौरी पाटील ,समीक्षा पाटील ,तन्वी पाटील, श्रुतिका सरदार पाटील, श्रुतिका कुंभार, श्वेता कांबळे, प्राची शिंदे, संध्या गायकवाड ,समीक्षा संताजी पाटील ,विराज करपे, श्रुती चौगले, श्रुतिका सदाशिव पाटील ,समीक्षा रामचंद्र पाटील, संजना येरुडकर, अंजली गायकवाड ,जिया पाटील ,स्नेहा पाटील, वैष्णवी कांबळे यांनी केले. गौरव कांबळे ,अभिनव मोरे, सुहास पाटील ,सर्वेश कांबळे यांनी शिपाई पदाची जबाबदारी पार पाडली . डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील व छात्र मुख्याध्यापिका श्रुतिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .सांस्कृतिक प्रमुख जी .डी लव्हटे व सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .विद्यार्थ्यांच्या वतीने माऊली पोवार हिने मनोगत व्यक्त केले .छात्र शिक्षकांच्या वतीने छात्र मुख्याध्यापक श्रुतिका सदाशिव पाटील हिने मनोगत व्यक्त केले .
यानंतर छात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिवसभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्याचा निकाल सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी जाहीर केला .यामध्ये शिक्षक शिक्षिका गटातून तन्वी पाटील ,श्रुती चौगले, समीक्षा पाटील, संजना येरुडकर श्रुतिका सदाशिव पाटील ,संध्या गायकवाड, यांनी पहिले पाच क्रमांक पटकावले .शिक्षकेतर कर्मचारी गटात अभिनव मोरे व शिवरंजन लोहार यांनी पहिले दोन क्रमांक पटकावले .
आभार एस पी पाटील यांनी मानले .यावेळी आर के कांबळे डी एस मोरे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
Comments
Post a Comment