पर्यावरणपूरक गणेशोत्सव अवाहन

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर

पर्यावरणपूरक गणेशोत्सव अवाहन  

एक पाऊल आधुनिकतेकडे ........

दिनांक - २९.०८.२०२२

पर्यावरण मंडळ  पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे

अवाहन......

                नमस्कार मित्रानो.

बुद्धीची देवता गणरायाचा आगमन होतय. त्यासोबतच त्याचबरोबर गौरी आणि शंकराचे आगमन होते आहे. आपल्या परंपरा सण उत्सव हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे.

मित्रांनो सण साजरी करूया पण पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवून. ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्या आणि विविध स्त्रोतांचे होणारे प्रदूषण रोखणे ही आज काळाची गरज बनली आहे. भावी पिढीला शाश्वत पर्यावरण पूरक विश्व देण्यासाठी खबरदारी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आम्ही आपल्याला पर्यावरण पूरक गणेश उत्सव व गौरी गणपतीचा सण साजरा करावा असे आवाहन करत आहोत. श्रद्धेला आधुनिक पर्यावरण पूरकतेची जोड देऊन परंपरा जपण्याबरोबरच सणांचा आनंदही लुटुया. यासाठी आपण खालील बाबी करू शकतो.

1. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती वापरणे

2. मूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंगापेक्षा नैसर्गिक रंगाचा वापर करणे.

3. उत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे.

4. अनावश्यक फटाके व आतषबाजी टाळणे.

5. डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्य व पारंपारिक खेळाचा मिरवणुकीसाठी वापर करणे.

6. निर्माल्य पिण्याच्या पाण्यामध्ये, नदीमध्ये, विहिरीमध्ये अथवा तळ्यामध्ये न टाकता ग्राम पंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करणे.

7. गणेश मूर्तींचे विसर्जन पाण्यामध्ये न करता ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये करणे.

8. गौरी व शंकर यांचे निर्माल्य नदीत न टाकता बाजूला टाकून त्याचा खतासाठी उपयोग करणे.

चला तर मित्रांनो ....

प्रशासनाला साथ देऊया..

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया....

परंपरेलाही आधुनिकतेची जोड देऊया...

आपला नम्र

पर्यावरण मंडळ

पी.एस.तोडकर हायस्कूल वाखरी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर

सौजन्य

ग्रामपंचायत वाकरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर  



Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात