सही पोषण देश रोशन

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर, जि. कोल्हापूर 

 पोषण महा अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन कार्यक्रम अंतर्गत सकस आहार  मार्गदर्शन , किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन, पोषण रॅली व पोषण शपथ कार्यक्रम संपन्न, 

दिनांक १३ सप्टेंबर २०२२ 





राष्ट्रीय पोषण महा उपक्रमाअंतर्गत सही पोषण देश रोशन उपक्रमामध्ये पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.
एकात्मिक बालक विकास कार्यक्रमाच्या परीक्षिका सौ सुतार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार बद्दल माहिती देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी यासंदर्भात उत्पादन केले.
या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी किशोरवयीन आरोग्याची काळजी व सकस आहार याबद्दल माहिती देण्यात आली त्याचबरोबर स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर सही पोषण देश रोशन या उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांनी घेतली व सकस आहाराविषयी जनजागृती करण्याचे मनोगत व्यक्त केले.
याच उपक्रमांतर्गत गावांमधून रॅली काढण्यात आली व ग्रामस्थांच्या मते सकस आहार विषयी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी सकस पोषण आहारासंबंधी विविध घोषणा देण्यात आल्या.


Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात