इंग्लिश डे उत्साहात संपन्न


पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर

इंग्लिश डे उत्साहात संपन्न 

दिनांक - २० सप्टेंबर २०२२ 
 


इंग्रजी दिन 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   इंग्रजी दिन उत्साहात साजरा झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील  होते .प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षक बी एम पाटील उपस्थित होते .
     अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. बी .बी पाटील यांनी जागतिक स्तरावर आज इंग्रजी भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे .शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये संभाषण करण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची गरज असल्याचे सांगितले . फक्त इंग्रजी दिनाच्या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी मधून भाषा न करता दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी आपापसात इंग्रजी मधून संभाषण करावे असे आवाहन केले .
       प्रमुख पाहुणे बी एम पाटील यांनी इंग्रजी भाषेचे महत्व सांगून भविष्यातील उच्च शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत होण्याची गरज असल्याचे सांगितले .विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून अशाच उत्साहात इंग्रजी  विषयाच्या अभ्यासात सातत्य ठेवावे असे आवाहन केले .
      यावेळी आर के कांबळे यांनी  विद्यार्थ्यांनी आपल्याला जशी येते तशा पद्धतीने इंग्रजी बोलण्यास सुरुवात करावी सरावानंतर आपल्याला इंग्रजी मधील वक्तृत्व कला वाढीस लागण्यास मदत होईल असे सांगितले .सुरुवातीस स्वागत सहाय्यक शिक्षक डी एस मोरे यांनी केले .प्रास्ताविक  एस पी पाटील यांनी केले .
    यावेळी घेण्यात आलेल्या  इंग्रजी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटांमध्ये तेवीस तर इयत्ता आठवीच्या लहान गटामध्ये दहा  अशा एकूण तेहतीस स्पर्धकांनी सहभाग घेतला .गटवार प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे .

इंग्लिश डे कार्यक्रमाचा व्हिडिओ खालील प्रमाणे 

                                                                    बी.एम .पाटील सर

                                                               बी.वी पाटील सर

                                                                         ज्ञानेश्वरी पाटील 


Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात