इयत्ता आठवी पालक सभा संपन्न

पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा  कोल्हापूर 

इयत्ता ८वी पालक सभा

वार - सोमवार  दिनांक - १९ सप्टेंबर २०२२



पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   येथे   इयत्ता आठवीच्या वर्गाची पालक सभा संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी पालक  सदाशिव मोरे होते .

   यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांनी इयत्ता आठवीच्या वर्गासाठी असलेल्या एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबत पालकांना माहिती दिली .विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा तसेच शाळेच्या वेळे व्यतिरिक्त घरामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून शाळेत सहकार्य करावेसे आव्हान केले . माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतःच्या देखरेखीखाली  थोडा वेळ 

स्मार्टफोन देण्याबाबत पालकांना सांगितले . 

     सहाय्यक शिक्षक बी एम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती पालकांना दिली .

          सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी केले .

पूर्वज्ञान क्षमता चाचणी व घटक चाचणी एक परीक्षेच्या निकालाचे वाचन वर्गशिक्षक एस पी पाटील यांनी केले .

       यावेळी झालेल्या चर्चेत पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .पालकांच्या वतीने शिवाजी शिंदे यांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत शाळेची आभार मानून पालकांनी आपला पाल्य शाळेच्या उपक्रमात सहभाग घेतो का नाही याबाबत नियमितपणे चौकशी करावी अशी आवाहन केले . अध्यक्ष स्थानावरून बोलताना सदाशिव मोरे यांनी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाच्या पाठीशी सर्व पालकांनी राहून विद्यार्थ्यांची प्रगती करूया असे आवाहन केले .

  यावेळी सहाय्यक शिक्षक आर के कांबळे डी एस मोरे यांचे सह  पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात