क्षेत्रभेट - रोपवाटिका अभ्यस भेट

पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर 

क्षेत्रभेट मनस्वी रोपवाटिका  वाकरे 

दिनांक २९/ ०९/२०२२

आज गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट अंतर्गत गावामध्ये असणाऱ्या मनस्वी रोपवाटिकेला अभ्यास भेट दिली.

सर्वप्रथम रोपवाटिकेचे मालक प्रदीप पाटील यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे स्वागत केले त्याचबरोबर रोपवाटिकेचे काम कसे चालते प्रत्यक्षपणे मुलांना समजावून सांगितले. रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेली भाजीपाल्याची रोपे तसेच उसाचे रोपे तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. शाळेच्या परिसरामध्ये ऊस हे प्रमुख पीक असल्याने विद्यार्थ्यांनी यासंबंधी बेणे तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली व त्यावरती रोपवाटिका मालक यांना विविध प्रश्न विचारले. 

रोपवाटिकेतून अर्थार्जनाबरोबरच शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे मिळवून देण्याचा मानस असल्याचा 

मनोदय त्याने व्यक्त केला.आधुनिक मशनरी वरती उसाच्या पेरा पासून उसाचा डोळा वेगळा करण्याची पद्धत मुलांनी पाहिली. प्रसंगी शाळेचे सहाय्यक शिक्षक आर के कांबळे सर डी एस मोरे सर बी एम पाटील सर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात