कर्मवीर भाऊराव पाटील जयंती संपन्न
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती संपन्न
दिनांक २२ सप्टेंबर २०२२
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे
ता करवीर जि कोल्हापूर
वार - गुरुवार दिनांक - २२ सप्टेंबर २०२२
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील होते .
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. बी .बी पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली .
सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या साठी केलेले शैक्षणिक कार्य सांगितले . तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक सुधारणांची माहिती दिली .
स्वागत व प्रास्ताविक डी एस मोरे यांनी केले .यावेळी सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे एस ए बिरंजे डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .आभार एस पी पाटील यांनी मानले .
Comments
Post a Comment