शाश्वत आरोग्यासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे गरजेचे -डॉक्टर बी बी पाटील

शाश्वत आरोग्यासाठी पर्यावरणाची जपणूक सण व संस्कृतीच्या माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर बी बी पाटील यांनी केले. ते पैलवान शंकर तोडकर स्कूल वाकरे व पर्यावरण क्लब यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव या विषयावर मार्गदर्शन करत होते. सन हा भारतीय संस्कृतीचा गाभा असून रूढी व परंपरा जपणे गरजेचे आहे पण त्याहीपेक्षा पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाची जपणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्लास्टिक चा वापर, रंगासाठी विविध रसायनांचा वापर, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायु प्रदूषण यासारख्या असंख्य बाबी आज मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम करत आहेत त्यामुळे पर्यावरण पूरक सण साजरे करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक जी डी लवटे यांनी केले तर आभार एस पी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला डी एस मोरे, सो एस ए बिरजे, डी एच शिंदे आधी उपस्थित होते.