अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
अण्णाभाऊ साठे जयंती साजरी दिनांक ०१.०१.२०२५
पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
दिनांक ०१.०८.२०२५
आज पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक माननीय बी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले
त्यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले योगदान विशद केले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे रचित माझी मैना गावाकड राहिली या काव्याच्या व्हिदिओ दाखवण्यात आला.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
प्रास्ताविक जी.डी. लव्हटे सर यांनी केले तर आभार एस पी पाटील सर यांनी मानले
Comments
Post a Comment