पालक सभा उत्साहात संपन्न
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे पालक सभा उत्साहात संपन्न
दिनांक 25 ऑगस्ट 2025
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल येथे पालक मेळावा संपन्न झाला. सदर पालक मेळावा मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमावर चर्चा झाली तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपयोजनांची माहिती शाळेच्या वतीने पालकांना देण्यात आली. शाळेतील विविध समित्या, CCTV, तक्रार पेटी, चाइल्ड हेल्पलाइन व यासंबंधीचे ॲप याविषयी पालकांना माहिती देण्यात आली.
पालकांच्या कडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध प्रश्न विचारण्यात आले व शाळेकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. सभेच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील सर यांनी पालकांना विविध समित्यांमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन करून मुलांच्या प्रगतीसाठी शाळा व पालक आणि समाज यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रयत्न करू असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी डी लवटे यांनी केले तर आभार एस पी पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर परीक्षा झाल्यानंतर पालक भेट घेण्याचे ठरले.
Comments
Post a Comment