Posts

Showing posts from August, 2022

सायबर कॉलेज कोल्हापूरच्या वतीने तोडकर हायस्कूल येथे मानसिक व शारीरिक आरोग्य कार्यशाळा

Image
 *दि. 25 ऑगस्ट 2022* सायबर कॉलेज कोल्हापूरच्या वतीने तोडकर हायस्कूल येथे मानसिक व शारीरिक आरोग्य कार्यशाळा _*ग्रामीण शिबिराचा दुसरा दिवस :*_ आज पै. शकर तोडकर हायस्कूल, वाकरे येथे सकाळ च्या सत्रात *'मानसिक व शरीरिक आरोग्य'* संदर्भात मार्गदर्शन शिबीर पार पडले. त्यावेळी,8, 9 वी  व दहावीच्या  विद्यार्थी विद्यार्थिनी  उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच व्याख्यात लाभलेल्या * प्रा. उर्मिला चव्हाण मॅडम * यांनी मुलांना मार्गदर्शन केले त्यावेळी पै. तोडकर हायस्कूल चे शिक्षक आर.के. कांबळे सर , गजानन लवटे सर, डी. एस. मोरे सर, शिबीर आयोजक शर्वरी काटकर मॅडम व सायबर कॉलेज चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त समूह राष्ट्रगान कार्यक्रम

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार  दिनांक - १७ ऑगष्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त समूह राष्ट्रगान कार्यक्रम           पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज  बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी समूह राष्ट्रगान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .              शाळेच्या वतीने मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी  व्हाट्सअपच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रुप वर समूह राष्ट्रगान कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत आवाहन केले होते .       शाळेच्या साऊंड सिस्टिम वरून राष्ट्रगान गायन करण्यात आले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक  बी एम पाटील आर के कांबळे जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे सौ एस ए बिरजे डी एच शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .गावातील नागरिकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला . सादर कार्यक्रमाचा चा  व्ह...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा

Image
  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर  वार - बुधवार  दिनांक - १७ ऑगष्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त  शालेय वक्तृत्व स्पर्धा   पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज  बुधवार दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या . यामध्ये शाळेतील चौदा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला .       यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील सहाय्यक शिक्षक  बी एम पाटील आर के कांबळे जीडी लव्हटे एस पी पाटील डी एस मोरे सौ एस ए बिरजे डी एच शिंदे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

स्वातंत्र्यदिनी पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे ध्वजारोहन समारंभ संपन्न

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर वाकरे दि १५  ऑगस्ट २०२२   स्वातंत्र्यदिनी पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे ध्वजारोहन समारंभ संपन्न पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे व श्री दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था मर्यादित वाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये श्री रंगराव कुंडलिक पोवार संचालक दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच विजय पोवार व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामविकास  अधिकारी, तलाठी ,आरोग्य सेविका, शिक्षण संस्थेचे व दुधसंस्थेचे  सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

वाकरे येथील विविध संस्थांच्या ध्वजारोहण समारंभात पै शंकर तोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर  पै शंकर तोडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा  वाकरे येथील विविध संस्थांच्या ध्वजारोहण समारंभात सहभाग  वाकरे दिनांक १५  ऑगष्ट  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामपंचायत विविध सहकारी संस्था आरोग्य उपकेंद्र येथे उपस्थित राहून ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला .                 ग्रामपंचायत वाकरे येथे  सरपंच वसंत तोडकर    यांच्या हस्ते .यावेळी उपसरपंच विजय पोवार ग्राम विकास अधिकारी  तलाठी यांचे सह सर्व सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते .       पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे व श्री दत्त सहकारी दूध व्यवसाय संस्था वाकरे यांच्या वतीने विद्यमाने आयोजित ध्वजारोहण समारंभात  दत्त दूध संस्थेचे संचालक  रंगराव कुंडलीक पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले          आरोग्य उपकेंद्र वाकरे येथे डॉ. स्वेता तोडकर  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .यावेळी ग्रामपंचायत चे ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संरक्षण सेवेतील सेवेतील जवान अक्षय सर्जेराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजारोहण

Image
   पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता. करवीर,  जि. कोल्हापूर दिनांक १४ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संरक्षण सेवेतील सेवेतील जवान अक्षय सर्जेराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजारोहण  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त प्रशासनाच्या  मार्गदर्शक सूचनानुसार आज रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला .  जवान अक्षय सर्जेराव पाटील  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले .          सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक  सांस्कृतिक प्रमुख जी .डी लव्हटे यांनी केले .यानंतर ध्वजारोहण होऊन ध्वजवंदन ध्वज गीत व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी.बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे एस पी पाटील  डी एस मोरे सौ एस ए बिरंजे डी .एच शिंदे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते ध्वजारोहन

Image
  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते  ध्वजारोहन  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता. करवीर,  जि. कोल्हापूर  वार - शनिवार  दिनांक - १३ ऑगष्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जयश्री करपे यांच्या हस्ते  ध्वजारोहन  आमच्या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला .आमच्या ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती जयश्री महादेव करपे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले .          स्वागत व प्रास्ताविक एस पी पाटील यांनी केले .यानंतर ध्वजारोहण होऊन ध्वजवंदन ध्वजगीत व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी.बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे जी .डी लव्हटे  डी एस मोरे सौ एस ए बिरंजे डी .एच शिंदे यांचेसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर  वार - शनिवार  दिनांक - १३ ऑगष्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा  संपन्न  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या .  शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भारताच्या राष्ट्रध्वजावर आधारित चित्र रेखाटन करून आकर्षक रंगात रंगकाम केले. या चित्राचे प्रदर्शन घेऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली .       यावेळी मुख्याध्यापक डॉ.बी बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे  जी .डी लव्हटे  एस पी पाटील  डी एस मोरे       डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सर्व धर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त  सर्व धर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा    दिनांक १३ ऑगष्ट २०२२  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त  सर्वधर्मीय भेटकार्ड तयार करणे स्पर्धा  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  येथे   स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षा निमित्त भेटकार्ड तयार करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या .  शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भारताच्या सर्वधर्म समभावतेचे दर्शन करणाऱ्या विविध धर्माच्या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारी भेटकार्ड तयार केलीत . या भेटकार्डांचे प्रदर्शन घेऊन सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली .         यावेळी मुख्याध्यापक डॉ.बी बी पाटील सहाय्यक शिक्षक बी एम पाटील आर के कांबळे  जी .डी लव्हटे  एस पी पाटील  डी एस मोरे . डी एच शिंदे यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये तिरंगा ध्वज जनजागृती रॅली.

Image
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये घरोघरी  तिरंगा ध्वज जनजागृती रॅली संपन्न . दिनांक १२ ऑगष्ट २०२२ ( सदर उपक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )     पैलवान शंकर तोडकर हायस्कूल यांच्या वतीने वाकरे गावामध्ये तिरंगा ध्वज जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये गावातील लोकांना  13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा असे आव्हान करण्यात आले सदर रॅलीमध्ये हायस्कूलमधील सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थनी यांनी सहभाग घेतला.सदर रॅली गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.

पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्यावतीने मोबाईल चे दुष्परिणाम व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या विषयी जनजागृतीपर व्याख्यान संपन्न

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर दिनांक १२ ऑगष्ट २०२२ पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्यावतीने मोबाईल चे दुष्परिणाम व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या वि बीषयी जनजागृतीपर व्याख्यान संपन्न वाकडे दिनांक 13 ऑगस्ट 2022. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्या वतीने पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल चे दुष्परिणाम  आणि तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी बोलताना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका दिपाली कासार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणाम विषयी सविस्तर माहिती देऊन मोबाईलचा अतिवापर आरोग्यास घातक असून गरजेपुरताच त्याचा वापर करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मुलांना माहिती दिली. सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी.पाटील व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका लता पाटील, सविता शिंदे. माधुरी आळवणे', आनंदी चौगुले' उल्लासी कांबळे; विमल पाटील व शाळेत...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्पीय उपकेंद्र वाकरे यांच्एया वतीने पी. एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न

Image
  पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्पीय उपकेंद्र वाकरे  यांच्या वतीने  पी. एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न वार - शुक्रवार  दिनांक -१२ ऑगष्ट २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पी एस तोडकर हायस्कूल वाकरे येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा संपन्न वाकरे दिनांक 12. येथील पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आरोग्य सेविका दिपाली कासार यांनी किशोरवयीन मुलींसाठी आहाराचे महत्त्व, ताणतणावाचे व्यवस्थापन, स्वच्छता व पूरक व्यायाम यासंबंधी माहिती दिली. कार्यक्रमाला शाळेच्या लिपिक संगीता बिरंजे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे येथील आरोग्य सेविका लता संभाजी पाटील, सविता कृष्णात शिंदे, माधुरी श्रीकांत आळवणे, आनंदी कृष्णा चौगुले, उल्हासी कांबळे, विमल पाटील व शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

पी.एस. तोडकर हायस्कूलचे आठ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा पास

  पी.एस. तोडकर हायस्कूलचे  आठ विद्यार्थी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा  पास  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - मंगळवार    दिनांक -११ ऑगष्ट २०२२ हार्दिक अभिनंदन  सन  २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षात झालेल्या एन एम एम एस परीक्षेत आमच्या पै . शंकर तोडकर हायस्कूल वाकरे या शाळेतील खालील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .  १) कु . पाटील प्रतीक्षा जयवंत  -  ८१ गुण   २) कु . पाटील साधना बाजीराव  -  ८० गुण   ३)  पाटील आयुष सागर  -  ७७ गुण   ४) कु . सातपुते पूर्वा अनिल  -  ७१ गुण   ५) कु . पाटील श्रुतिका सदाशिव  -  ७१ गुण   ६)  पाटील शुभम भगवान -  ७१ गुण   ७)  कांबळे गौरव शशिकांत -  ५९ गुण   ८)  गायकवाड संध्या आकाराम  -  ५८ गुण   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन    पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे   मुख्याध्याप...

पी.एस. तोडकर हायस्कूल वाकरेच्या वतीने एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम

Image
 पी.एस. तोडकर हायस्कूल  वाकरेच्या  वतीने एक  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम   पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - मंगळवार    दिनांक - ९ ऑगष्ट २०२२ पी.एस. तोडकर हायस्कूल  वाकरेच्या  वतीने एक  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम   देशाच्या सीमेवरती आपले कर्तव्य बजावनाऱ्या संरक्षण  दलातील जवानांच्या प्रती आदर व कृतज्ञता म्हणून   ए क  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम   शाळेच्या वतीने राबवण्यात आला. यासाठी मुलांना शाळेच्या वतीने आवाहन करण्यात आले त्यानुसार मुलानी स्वतः तयार केलेल्या व खाऊच्या पेशातून खरेदी केलेल्या राख्या शाळेच्या वतीने कोल्हापूर येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या कार्यालयात सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्याकडे जमा करण्यात आल्या. सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी या प्रसंगी बोलताना कोल्हापुरातून खूप मोठ्या प्रमाणात सैन्य दलातील जवानांसाठी राख्या प्राप्त झाल्या असून कोल्हापूरकरांच्या या प्रेमाबद्दल  कृतज्ञता व्यक्त करून शाळेतील मुलांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल   कौतुक क...

शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न

Image
  शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार  दिनांक - ८ ऑगष्ट  २०२२ शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक संपन्न  पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शालांतर्गत विज्ञान मंडळाची बैठक मुख्याध्यापक कक्षामध्ये नुकतीच पार पडली. सदर बैठकीमध्ये विज्ञान विभागामार्फत वर्षभरामध्ये राबवावयाचे उपक्रम व इन्स्पायर अवॉर्ड तसेच शालेय विज्ञान प्रदर्शन यासाठी उपकरण तयार करणे यावर चर्चा करण्यात आली. विज्ञान मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये घेण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन व त्यासंबंधीच्या जबाबदाऱ्या याचे वाटप करण्यात आले. सदर बैठकीला विज्ञान मंत्री, शालेय विज्ञान मंडळातील सर्व सदस्य, शाळेचे विज्ञान विभाग प्रमुख एस पी पाटील व मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील उपस्थित होते.

शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न

Image
   शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार  दिनांक - ८ ऑगष्ट  २०२२ शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक संपन्न  पैलवान शंकर तोडकर स्कूल वाकरे येथे शालांतर्गत सांस्कृतिक मंडळाची बैठक नुकतीच कार्यालयात पार पडली. याप्रसंगी शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती मंडळाला देऊन त्याबाबत करावयाची तयारी याची नियोजन मंडळातील सदस्यांना अवगत करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मंडळाच्या माध्यमातून पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या तसेच कामाची विभागणीही करून देण्यात आली. सभेला संस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख जी डी लवटे व मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती

Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार  दिनांक - ८ ऑगष्ट  २०२२ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती  पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या उपक्रमा अंतर्गत घ्यावयाची उपक्रम तिरंगा रॅली, घोषवाक्य, तिरंगा ध्वज घरावरती लावण्याबाबतची जनजागृती  कार्यक्रम याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक डॉ. बी. बी. पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्ट ते  15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकत ठेवून आपल्या परिसरातील लीकानाही याबाबत जागृत करण्याचे आवाहन करून  देश प्रेमाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. उपक्रम संबंधी माहिती संस्कृती विभाग प्रमुख जीडी लवटे यांनी दिली कार्यक्रमाला सहायक शिक्षक बी एम पाटील, आर के कांबळे, एस पी प...

पी.एस. तोडकर हायस्कूल दहा विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र

Image
पी.एस. तोडकर हायस्कूल  दहा विद्यार्थी  छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार  दिनांक - १५ जून  २०२२ पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मधील दहा विद्यार्थ्यांना सारथी या संस्थेच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. सदर मुलांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा आठशे रुपये अशी प्रतिवर्षी 9600 रुपये तर बारावी पर्यंत एकूण 38400 इतकी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. सदर शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये  गौरी पाटील, आदित्य पाटील, श्वेता पोवार, श्रद्धा पाटील, तनुजा दत्तात्रय पाटील, तनुजा उत्तम पाटील, हर्षदा पोवार, धनश्री पाटील, सिद्धी जाधव व प्रणवती तोडकर यांचा समावेश आहे. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी.बी.पाटील, सहाय्यक शिक्षक बी एम पाटील, जी डी लव्हटे, आर के कांबळे, एस पी पाटील व डी एस मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतिवीर नाना पाटील जयंती

Image
  क्रांतिवीर नाना पाटील जयंती पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - बुधवार   दिनांक - ३ ऑगष्ट २०२२ क्रांतिवीर नाना पाटील जयंती   आमच्या शाळेत  क्रांतिवीर नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते .                  सांस्कृतिक विभाग प्रमुख  शिक्षक  जी.डी लव्हटे यांनी क्रांतिवीर नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच प्रतिसरकार च्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात केलेल्या संघर्ष याबाबत माहिती दिली . तसेच बहुजन समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली .   सुरुवातीस सहाय्यक शिक्षक बी एम  पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  आभार सहाय्यक शिक्षक अरे के कांबळे यांनी   मानले .  यावेळी शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

शालेय मंत्रिमंडळ

Image
  शालेय मंत्रिमंडळ स्थापना   पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार -  शुक्रवार  दिनांक -  ०१ जुलै  २०२२ शालेय मंत्रिमंडळ स्थापना                लोकशाहीची मूल्ये  शालेय जीवनामध्येच मुलांच्या मध्ये रुजावीत व लोकशाहीचा अनुभव शालेय जीवनामध्येच मिळावा यासाठी शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येते. 2022 साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने प्रत्यक्ष मतदान पद्धतीने  केली गेली आणि त्यातून निवडलेले प्रतिनिधी खालील प्रमाणे.

चिमणीची घरटे पर्यावरणप्रक उपक्रम

Image
चिमण्यांची  घरटी - पर्यावरणप्रक उपक्रम    पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - मंगळवार  दिनांक -  १३ जुलै  २०२२ चिमण्यांची  घरटी - पर्यावरणप्रक उपक्रम                                                                                           व्हिडिओ                शाळेचा माजी विद्यार्थी रामचंद्र ज्ञानदेव पाटील याच्या सहकार्यातून शाळेच्या व्हारांद्यामध्ये व परीसारामधून पक्षाची विशेषतः चीमाण्यासाठी घरटी  लावण्यात आली होती. निसर्गात अन्न साखळीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे.त्याप्रमाणे चिमण्यांना सुद्धा आहे. आज झपाट्याने चिमण्यांची संख्या कमी होत आहे. यासाठी राष्ट्रीय व  जागातिक स्तरावर चिमणी वाचावा  मोहीम स...

शालेय आरोग्य तपासणी

Image
शालेय आरोग्य तपासणी संपन्न   पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर वार - मंगळवार  दिनांक -  १३ जुलै  २०२२ शालेय आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक क्रमांक चार  ग्रामीण रुग्णालय खुपिरे यांच्या मार्फत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या प्रसंगी  महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील, शीतल पाटील , निता निकम  उपस्थित होत्या. पथकाकडून विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी घ्यावयाची काळजी, आहार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.