पी.एस. तोडकर हायस्कूल वाकरेच्या वतीने एक राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम

 पी.एस. तोडकर हायस्कूल  वाकरेच्या  वतीने एक  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम 

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - मंगळवार    दिनांक - ९ ऑगष्ट २०२२

पी.एस. तोडकर हायस्कूल  वाकरेच्या  वतीने एक  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम 

देशाच्या सीमेवरती आपले कर्तव्य बजावनाऱ्या संरक्षण  दलातील जवानांच्या प्रती आदर व कृतज्ञता म्हणून क  राखी सीमेवरील जवानांसाठी उपक्रम  शाळेच्या वतीने राबवण्यात आला.
यासाठी मुलांना शाळेच्या वतीने आवाहन करण्यात आले त्यानुसार मुलानी स्वतः तयार केलेल्या व खाऊच्या पेशातून खरेदी केलेल्या राख्या शाळेच्या वतीने कोल्हापूर येथील मराठा लाईट इन्फंट्रीच्या कार्यालयात सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्याकडे जमा करण्यात आल्या. सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी या प्रसंगी बोलताना कोल्हापुरातून खूप मोठ्या प्रमाणात सैन्य दलातील जवानांसाठी राख्या प्राप्त झाल्या असून कोल्हापूरकरांच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शाळेतील मुलांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल  कौतुक केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी. बी. पाटील व विद्यार्थिनी प्रणोती तोडकर, गौरी पाटील, ज्ञानेश्वरी पाटील, हर्षदा पोवार व धनश्री पाटील आदी उपस्थित होत्या. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात