पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्यावतीने मोबाईल चे दुष्परिणाम व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या विषयी जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
पै. शंकर तोडकर हायस्कूल वाकरे, ता करवीर जि कोल्हापूर
दिनांक १२ ऑगष्ट २०२२
पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्यावतीने मोबाईल चे दुष्परिणाम व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम या वि बीषयी जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
वाकडे दिनांक 13 ऑगस्ट 2022.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य उपकेंद्र वाकरे यांच्या वतीने पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल चे दुष्परिणाम आणि तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी बोलताना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका दिपाली कासार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणाम विषयी सविस्तर माहिती देऊन मोबाईलचा अतिवापर आरोग्यास घातक असून गरजेपुरताच त्याचा वापर करावा असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मुलांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी.पाटील व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका लता पाटील, सविता शिंदे. माधुरी आळवणे', आनंदी चौगुले' उल्लासी कांबळे; विमल पाटील व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या
Comments
Post a Comment