पी.एस. तोडकर हायस्कूल दहा विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र

पी.एस. तोडकर हायस्कूल  दहा विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र

पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे,  ता करवीर जि कोल्हापूर

वार - बुधवार  दिनांक - १५ जून  २०२२




पैलवान शंकर तोडकर हायस्कूल मधील दहा विद्यार्थ्यांना सारथी या संस्थेच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. सदर मुलांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा आठशे रुपये अशी प्रतिवर्षी 9600 रुपये तर बारावी पर्यंत एकूण 38400 इतकी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे. सदर शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये  गौरी पाटील, आदित्य पाटील, श्वेता पोवार, श्रद्धा पाटील, तनुजा दत्तात्रय पाटील, तनुजा उत्तम पाटील, हर्षदा पोवार, धनश्री पाटील, सिद्धी जाधव व प्रणवती तोडकर यांचा समावेश आहे.

सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी.बी.पाटील, सहाय्यक शिक्षक बी एम पाटील, जी डी लव्हटे, आर के कांबळे, एस पी पाटील व डी एस मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

शिवराज्याभिषेक दिन

झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात