Posts

Showing posts from 2025

विज्ञान दिन उत्साहात संपन्न

Image
 विज्ञान दिन उत्साहात संपन्न  सर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनानिमित्त पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला.  याप्रसंगी बोलताना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री जी डी लवटे यांनी सर विश्वेश्वरया यांच्या जीवना बद्दल माहिती देऊन त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शिक्षक श्री एस पी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील होते. तर आभार क्रीडा शिक्षक डी एस मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

हिंदी दिवस उत्साहात संपन्न

Image
 हिंदी दिवस उत्साहात संपन्न  पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शाळेचे माजी हिंदी शिक्षक आर के कांबळे यांनी हिंदी ही भारताची राजभाषा असून भाषा जोडण्याचे काम करते तोडण्याचे नाही त्यामुळे प्रत्येक भाषेचा सन्मान करणे गरजेचे असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक यांनी केले तर स्वागत एस पी पाटील यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर बी बी पाटील होते. आभार यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी संपन्न.

Image
 शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी संपन्न.  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ग्रामीण रुग्णालय खुपिरे पथक क्रमांक चार यांच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रद्धा पाटील व डॉक्टर शरद तावडे यांनी सहकार्य केले. तसेच शीतल पाटील गीता मॅडम यांचे सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संदर्भीय सेवेसाठी आठ आठ विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांसाठी एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न

Image
 शालेय विद्यार्थ्यांसाठी एड्स  संवेदीकरण कार्यशाळा संपन्न  11/09/2025 जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी संवेदीकरण कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेला समुपदेशक महेश्वरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एड्स रोगाविषयी माहिती देऊन त्याची लागण व दक्षता त्याबाबत माहिती दिली . याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय खुपिरे येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ सतीश पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेची ज्येष्ठ शिक्षक गजानन लवटे यांनी केले तर स्वागत सहाय्यक शिक्षक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बीबी पाटील होते तर आभार डीएस मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या

झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
 पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे झिम्मा फुगाडी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या  दिनांक 09/09.2025 पैलवान शंकरतोडकर हायस्कूल वाकरे येथे शालेय अंतर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडल्या. इयत्ता आठवी नववी दहावी प्रत्येक वर्गातील एका संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.  सदर स्पर्धेमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा प्रथम तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी चा द्वितीय तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला.  स्पर्धेसाठी पंच म्हणून मंगल पाटील, रोहिणी सुतार मॅडम, बिरंजे  मॅडम  वसोनाली  धतुरे मॅडम  यांनी काम पाहिले.

शिक्षक दिन उत्साहात संपन्न

Image
 शिक्षक दिन उत्साहात संपन्न दिनांक 4/ 9/2025 पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक बी बी पातील यांनी उप राष्ट्रपती सर्वांपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.शाळेतील विद्यार्थ्यानी एक दिवस शाळा चालवली. 

शाश्वत आरोग्यासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे गरजेचे -डॉक्टर बी बी पाटील

Image
 शाश्वत आरोग्यासाठी पर्यावरणाची जपणूक सण व संस्कृतीच्या माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉक्टर बी बी पाटील यांनी केले. ते पैलवान शंकर तोडकर स्कूल वाकरे व पर्यावरण क्लब यांच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश उत्सव या विषयावर मार्गदर्शन करत होते.  सन हा भारतीय संस्कृतीचा गाभा असून रूढी व परंपरा जपणे गरजेचे आहे पण त्याहीपेक्षा पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाची जपणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्लास्टिक चा वापर, रंगासाठी विविध रसायनांचा वापर, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायु प्रदूषण यासारख्या असंख्य बाबी आज मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम करत आहेत त्यामुळे पर्यावरण पूरक सण साजरे करणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक जी डी लवटे यांनी केले तर आभार एस पी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला डी एस मोरे, सो एस ए बिरजे, डी एच शिंदे आधी उपस्थित होते.

गणेश उत्सव पर्यावरण पूरक रीतीने साजरा करण्यासाठी पर्यावरण मंडळाच्या वतीने आवाहन.

Image
गणेश उत्सव पर्यावरण पूरक रीतीने साजरा करण्यासाठी पैलवान शंकर तोडकर हायस्कूल व पर्यावरण मंडळ यांच्या वतीने आवाहन 

उमेद फाउंडेशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Image
 उमेद फाउंडेशन यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप  दिनांक 26 ऑगस्ट 2025  उमेद फाउंडेशन सांगरूळ यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आली यामध्ये स्कूल बॅग वह्या व इतर शालोपयोगी साहित्याचा समावेश होता. सदर कार्यक्रमांमध्ये फाउंडेशनच्या वतीने सचिन बगाडे यांनी फाउंडेशन राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी फाउंडेशन मदत करत असल्याची सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीडी लवटे यांनी केले तर आभार डीएस मोरे यांनी मानले.

पालक सभा उत्साहात संपन्न

Image
 पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे पालक सभा उत्साहात संपन्न  दिनांक 25 ऑगस्ट 2025 पैलवान शंकर तोडकर हायस्कूल येथे पालक मेळावा संपन्न झाला. सदर पालक मेळावा मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमावर चर्चा झाली तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपयोजनांची माहिती शाळेच्या वतीने पालकांना देण्यात आली. शाळेतील विविध समित्या, CCTV, तक्रार पेटी, चाइल्ड हेल्पलाइन व यासंबंधीचे ॲप याविषयी पालकांना माहिती देण्यात आली.  पालकांच्या कडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध प्रश्न विचारण्यात आले व शाळेकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. सभेच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील सर यांनी पालकांना विविध समित्यांमध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन करून मुलांच्या प्रगतीसाठी शाळा व पालक आणि समाज यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रयत्न करू असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी डी लवटे यांनी केले तर आभार एस पी पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर परीक्षा झाल्यानंतर पालक भेट घेण्याचे ठरले.

सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांची कोजीमाशी पतसंस्थेच्या शाखा संचालक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार

Image
 सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांची कोजीमाशी पतसंस्थेच्या शाखा संचालक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार दिनांक १९ ऑगस्ट २०२५  शाळेचे सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या कोपर्डे शाखेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण सातपुते याची पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार

Image
शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण  सातपुते याची  पवित्र पोर्टल मधून  शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार दिनांक १९ ऑगस्ट २०२५  आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रवीण जोतीराम सातपुते यांची पवित्र पोर्टल मधून सांगरुळ शिक्षण संस्थेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहल करपे हिने शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार.

Image
 शाळेची माजी विद्यार्थिनी स्नेहल करपे हिने शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार. दिनांक १८ ऑगस्ट २०२५  शाळेची माजी विद्यार्थिनी कु.स्नेहल महादेव करपे हिने शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल .त्यांचा मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केली कवायत

Image
 स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केली कवायत दिनांक १५ ऑगस्टब २०२५  स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये आयोजित ध्वजारोहण समारंभामध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर केली. कवायतीचे विविध प्रकार सादर केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीराव तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Image
 स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवाजीराव तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न दिनांक १५ ऑगस्ट २०२५ भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अति वोटर साहेबांनी बोलवून आलो शुक्रवार  दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी  आमच्या शाळेत ध्वजारोहण श्री जोतिर्लिंग शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी तोडकर  यांच्या हस्ते केले .यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक श्री दत्त दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

सहाय्यक शिक्षक श्री गजानन लव्हटे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Image
 सा. शिक्षक गजानन लव्हटे यांच्या हस्ते ध्वजारोहण व सामुहिक पसायदान  पठण संपन्न दिनांक १४ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अति वोटर साहेबांनी बोलवून आलो गुरुवार दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी  आमच्या शाळेत ध्वजारोहण शाळेचे सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे यांच्या हस्ते केले .यावेळी मुख्याध्यापक डॉ बी बी पाटील व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . दिनांक १४ ऑगस्ट २०२५  2025 हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे त्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शाळेमध्ये पसायदान म्हणण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला व सामूहिकपणे पसायदान म्हणण्यात आले.

मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Image
 मुख्याध्यापक बी बी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न दिनक १३ ऑगस्ट २०२५  भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी  आमच्या शाळेत ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांच्या हस्ते केले .यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .

भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून काढून जनजागृती केली

Image
 भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून काढून जनजागृती केली. दिनांक १२ ऑगस्ट २०२५  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढली . याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन हातामध्ये तिरंगी झेंडे घेऊन रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला.

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रेझेंटेशन दाखवण्यात आले

Image
 हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रेझेंटेशन ऑनलाइन प्रेझेंटेशन दाखवण्यात आले दिनांक ०८ ऑगस्ट२०२५  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या संकेतस्थळावरील प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. भारतीय तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर ध्वज संहिता बद्दल माहिती शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री गजानन लवटे यांनी दिली.

हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा रांगोळी स्पर्धा संपन्न

Image
 हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत शाळेमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा संपन्न दिनांक ०७ ऑगस्ट२०२५ भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत शाळेमध्ये तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला व भारतीय तिरंग्यावरती आपले प्रेम व्यक्त केले.

सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करणे

Image
       कृतज्ञता म्हणून सीमेवरील जवानांसाठी राख्या तयार करणे व पाठवणे दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ 🏵️ एक राखी सीमेवरील जवानांसाठी 🏵️    पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्यावतीने   एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. यासाठी शाळेमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमधून बनवण्यात आलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी कोल्हापूर येथील मराठा लाईफ इन्फंट्री यांच्याकडे सोपवण्यात आल्या.  देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 🌸🌸🌸🌸🌸

कार्यानुभव कार्यशाळा संपन्न

Image
 कार्यानुभव कार्यशाळा संपन्न -पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे  दिनांक 06 .08.2025 पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यानुभव कार्यशाळा आयोजित करण्यत आली. कागदा पासून व विविध टाकाऊ वस्तूपासून विविध कलाकृती व वस्तु  तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यत आले. शाळेतील विद्यार्थ्यानी या कार्यशाळेचा  लाभ घेतला. 

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट

Image
 आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट ०२ ऑगस्ट २०२५ पै.शंकर तोडकर हायस्कूल  वाकरे  यांच्यावतीने आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराची माहिती व्हावी या उद्देशाने ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे या पतसंस्थेला भेट दिली तेथील व्यवस्थापक पांडुरंग बिरंजे व सुरेश तोडकर यांनी बँकिंग व्यवहाराची माहिती विद्यार्थ्यांना दिली याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष हिंदुराव पाटील व डी.एस मोरे व पतसंस्थेचे  कर्मचारी उपस्थित होते. 

मुलींसाठी कुमारवयीन जीवन कौशल्ये व आहार कार्यशाळा संपन्न

Image
 मुलींसाठी कुमारवयीन जीवन कौशल्ये आणि आहार कार्यशाळा संपन्न  ०१.०८.२०२५ तोडकर संजीवनी हॉस्पिटल गंगावेस कोल्हापूर व पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे यांच्या वतीने किशोरवयीन मुलींच्यासाठी जीवन कौशल्य व आहार मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती .यावेळी हॉस्पिटलच्या वतीने सुरेखा पडवळ व प्रियांका चव्हाण यांनी विद्यार्थिनींना किशोरवयीन वयामध्ये होणारे शरीरातील बदल व त्याचे व्यवस्थापन, मानसिक ताणाचे व्यवस्थापन व या काळात घ्यावयाचा योग्य आहार याबाबत मार्गदर्शन केले

अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Image
 अण्णाभाऊ साठे जयंती साजरी दिनांक ०१.०१.२०२५  पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी  दिनांक ०१.०८.२०२५ आज पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली  लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक माननीय बी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेले योगदान विशद केले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे रचित माझी मैना गावाकड राहिली या काव्याच्या व्हिदिओ दाखवण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रास्ताविक जी.डी. लव्हटे सर यांनी केले तर आभार एस पी पाटील सर यांनी मानले

भूकंप आणि सुनामी का घडतात ?

Image
 भूकंप आणि सुनामी बाबत विद्यार्थ्याना माहिती   ३१.०७.२०२५  ३० जुलै रोजी पसिफिक समुद्रात भूकंप होऊन सुनामी आली.त्याच्या अनुषंगाने भूकंप का होतात व त्यातून भूगर्भातील होणार्या हालचाली व त्याचे होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बी बी पाटील यांनी माहिती दिली. यावेळी २०११ साली जपान मध्ये आलेल्या सुनामीचे व्हिदिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. 

लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

Image
 लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी  आज लोकमान्य टिळक जयंती शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे कर्मचारी डी एच शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक डी एस मोरे यांनी लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांचा बाणेदारपणाविषयक केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस पी पाटील यांनी केले तर आभार जी डी लवटे यांनी मांनले 

शालेय विद्यार्थ्यांना धनुर्वात प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली

Image
 हायस्कूल मधील इयत्ता दहावी तील विद्यार्थी विद्यार्थिनींना धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली.  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकर यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी धनुर्वात प्तिबंधक लस देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असा हा उपक्रम शाळा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाखरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी

Image
  शालेय विद्यार्थी रक्तातील हिमोगलोबिन तपासणी  17/07/2025 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाकरे यांचे वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हिमोगलोबिन तपासणी  करण्यात आली. यामध्ये शाळेतील 117 विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. राजू ढेंगे व पूनम यादव यांनी उपकेंद्रातीक कर्मचारी  आशा यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी विध्यर्थ्यांना रक्तातील हिमोगलोबिनचे योग्य प्रमाण व आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान

Image
  शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवाहन कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी रास्ता सुरक्षा अभियान  दिनांक 14/07/2025  मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापुर यांच्या मार्फत  पै शंकर तोड़कर हायस्कूल वाकरे शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले  या प्रसंगी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक नियुक्त सरपंच सौ अश्विनी पाटील उपस्थित होत्या यावेळी वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक श्री सागर भोसले यानी वाहतूकीचे नियम समजावून सांगितले तसेच वाहन चालवताना कशी काळजी घ्यावी हे सांगितले. त्यानंतर सहाय्यक वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक निकिता नाईक यानी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली.यावेळी ज्योतिर्लिंग शिक्षण संस्था अध्यक्ष श्री के एच माने सचिव श्री शिवाजीराव तोड़कर संचालक श्री ए बी बिरजे उपसरपंच श्री अमर करपे ग्राम पंचायत सदस्य श्री विजय पाटिल श्री तुषार मोरे श्री धनाजी पाटील उपस्थित होते तसेच श्री  सुरेश करपे श्री  चंद्रकांत पाटील श्री आनंदा गुरव श्री सुभाष करपे उपस...
Image
  दिनांक १०.०७.२०२५ गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात  आज आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. बी बी पाटील सर  होते.सुरुवातीला इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु.चैत्राली पाटील कु.भक्ती पाटील कु. राजनंदिनी पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. शाळेचे शिक्षक श्री. जी.डी. लव्हटे सर यांनी आपल्या प्रास्ताविक  मध्ये व्यक्तीच्या जीवनातील गुरुचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.मुख्याध्यापक मा. बी.बी.पाटील सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले व्यक्तीच्या प्रत्येक क्षेत्रानुसार त्यांना गुरु  असतो त्यांना मार्गदर्शन करत असतो त्यामुळे व्यक्तीचे ध्येय प्राप्त करता येते असे सांगितले. सूत्रसंचालन श्री एस पी पाटील सर यांनी केले तर आभार श्री डी एस मोरे सर यांनी मानले

कृषी दिनानिमित्य वृक्षारोपण संपन्न

Image
 ०१.०७.२०२५ कृषी दिनानिमित्य वृक्षारोपण संपन्न  कृषिदिन निमित्य शाळेच्या क्रिडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचे महत्व याप्रसंगी विषद करण्यात आले .

आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान .

Image
 दिनांक २७.०६.२०२५  आमदार  जयंत आसगावकर  यांच्या फंडातून शाळेस स्मार्ट टीव्ही प्रदान . पुणे विभागाचे शिक्षक आमदार माननीय प्राध्यापक जयंत आसगावकर साहेब यांच्या फंडातून आमच्या पै शंकर तोडकर हायस्कूल वाकरे शाळेस स्मार्ट टीव्ही देण्यात आला .यावेळी आमदार जयंत  आसगावकर साहेब सहाय्यक शिक्षक जी डी लव्हटे, डी एच शिंदे, प्रा एस पी चौगले, अमेय आसगांवकर आदी .

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
  दिनांक २६.०६.२०२५ राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी पै.शंकर तोडकर हायस्कूल वाकरे     राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली .  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डॉ .बी बी पाटील होते . छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक  आर.के.कांबळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनी देवयानी कांबळे अनुष्का चौगले चैत्राली पाटील भक्ती पोवार श्वेता परिट  प्राची पाटील  श्रेया पाटील यांनी  शाहू महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. आर के कांबळे  यांनी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्याचा आढावा घेतला बी.बी.पाटील  यांनी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य व सांस्कृतिक कार्याविषयी माहिती दिली यावेळी सहाय्यक शिक्षक जी.डी. लव्हटे , एस पी पाटील,  डी एस मोरे, एस ए बिरंजे , डी एच शिंदे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . आभार कु. श्रेया पाटील हिने मानले .सूत्रसंचलन कु. प्रणाली पाटील व कु.अनुष्का मोरे यांनी केले...

करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत मुलीना मार्गदर्शन

Image
  करवीर पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमांतर्गत विठाई चंद्राय हॉल येथे शाळेतील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. विठाई चंद्रई हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे उपस्थित होते. विद्यार्थिनींना महिला विषयक कायदे, आहार व आरोग्य, कौटुंबिक वाद विवाद निराकरण, बचत गट दक्षता, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची दक्षता व करिअर मार्गदर्शन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या 50 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

योग दिन साजरा - योगासन प्रात्यक्षिके

Image
 २१ / ०६ / २०२५  21 जून आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त पैलवान शंकर तोडकर हायस्कूल वाकरे येथे  योगासन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शाळेतील सहाय्यक शिक्षक गजानन लवटे व क्रीडाशिक्षक डी एस मोरे त्यांनी विद्यार्थ्यांच्या कडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. याप्रसंगी योगासन व त्यांचे आरोग्यातील महत्त्व त्यासंबंधी शाळेतील सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक बी बी पाटील, दत्तात्रेय शिंदे, बिरंजे मॅडम आधी उपस्थित होते

तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अंतर्गत तंबाखू मुक्त शाळा उपक्रम - तंबाखूमुक्त शपथ

Image
२३/०६/२०२५    आमच्या शाळेत तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत मंगळवार दिनांक २३ जून २०२५ रोजी विद्यार्थी व शिक्षक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली .सहाय्यक शिक्षक एस पी पाटील यांनी तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व व्यसनापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .